शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified: अॅमस्टरडॅम , मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (12:21 IST)

सावधान, एक चुबंन देते 8 कोटी जीवाणूंचे संक्रमण!

प्रेमाचे प्रतीक असलेले चुंबन प्रेमाच्या आदान-प्रदानाबरोबरच आणखी काही गोष्टींची देवाण-घेवाण करते. संशोधकांनी म्हटले आहे, की चुंबनामुळे 8 कोटी जीवाणूंचे संक्रमण होऊ शकते. 
 
नेदरलँडच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये असे दिसून आले आहे की दहा सेकंदांच्या चुंबनाच्या काळात 8 कोटी जीवाणूंचे आदान-प्रदान होत असते. 
 
ऑर्गनायझेशन फॉर अप्लाईड सायंटिफिक रिसर्चचे संशोधक रेमको कॉर्ट यांनी याबाबतची माहिती दिली ते म्हणाले, इंटिमेट किसिंगवेळी दोन व्यक्तींच्या तोंडातील जीवाणूंचेही आदान-प्रदान होत असते. त्यामुळे पती-पत्नी किंवा लिव्ह-इन जोडीदारांच्या तोंडाचा मायक्रोबॉयोटा बराचसा सारखा असतो! मनुष्याच्या शरीरात सुमारे शंभर महापद्म इतके सूक्ष्म जीव असतात. त्यांचे काम आपण खाल्लेले भोजन पचवणे आणि शरीराला आवश्यक असे संप्रेरक, पोषकतत्त्व तयार करणे तसेच आजारांना रोखणे हे असते. 
 
आपल्या तोंडामध्येच सातशे प्रकारच्या प्रजातींचे जीवाणू असतात!