बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

स्टीम्ड चिकन

साहित्य : 1 देशी चिकन, चवीनुसार मीठ.
 
सॉससाठी साहित्य - एक लहान चमचा लसणाची पेस्ट , 1/2 चमचा वाटलेली हिरवी मिरची, एक लहान चमचा सोया सॉस, कोथिंबीर सजविण्यासाठी, 1 लहान चमचा तेल. 
 
कृती : संपूर्ण चिकनवर मीठ लावून 10 मिनिटापर्यंत ठेवावे. स्टीमरमध्ये पाणी भरावे व प्लेटमध्ये चिकन ठेवून ते स्टीमरमध्ये ठेवून 30 मिनिटपार्यंत स्टीम करावे. 
 
सुई किंवा चॉप स्टिक टाकून पाहावे की चिकन व्यवस्थित शिजले आहे किंवा नाही. नंतर बाहेर काढून तुकड्यांमध्ये कापावे व प्लेटमध्ये ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात लसुण व हिरव्या मिरच्या टाकून परतावे. 
 
सोया सॉस व उरलेले पाणी (उकळलेल्या चिकनचे) टाकून सॉस तयार करावा. सॉस चिकनवर टाकावे. वरून कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.