1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

टोमॅटोची ग्रीन चटणी

साहित्य : दोन कच्चे टोमॅटो, अर्धी वाटी किसलेले खोबरे, फोडणीसाठी तेल, हिंग, हळद, तीळ तीन चमचे, चार हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.
 
कृती : दोन कच्चे टोमॅटो घेऊन त्याच्या फोडी करा. साधारण दीड डाव तेल घ्या. त्यात मोहरी, हिंग व थोडी हळद घालून फोडणी करा. त्यात तीन चमचे तीळ, अर्धी वाटी किसलेले खोबरे व चार हिरव्या मिरचिचेतुकडे करून घाला. थोडे परतून टोमॅटोच्या फोडी घाला आणि परतून अर्धकच्चे शिजवा. चवीनुसार मीठ घाला. यामुळे टोमॅटोचा कच्चटपणा, तुरटपणा जातो. नंतर हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून चटणी वाटून घ्या. आवडीनुसार ही चटणी मऊसूत किंवा थोडी जाडसर कशीही ठेवता येते. ती पोळी, भाकरी, पावाबरोबर चांगली लागते.