1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By

चना पिंडी (काबुली चणे पंजाबी पद्धत)

kabuli chana
साहित्य : 4 कप काबुली चणे रात्रभर भिजवून निथळून घेतलेले, 2 मोठे चमचे डाळिंबाचे दाणे, 2 मोठे चमचे जिरे, 4 कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, 4 मसाला वेलच्या, 5 तुकडे दालचिनी, 10 लवंगा, 4 मोठे चमचे धणे पूड, 2 छोटे चमचे गरम मसाला पूड, 3 मोठे चमचे कैरी पूड, 6 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, 15 ग्रॅम आले बारीक कापलेले, 1/2 कप तेल, 1/2 कप तूप, 1 कांदा उभा चिरलेला, 2 लिंबे फोडी केलेली. 
 
कृती : तव्यात डाळिंबाचे दाणे आणि जिरे एकत्र ‍भाजा आणि त्याची पूड करा. कुकरमध्ये पाणी घाला. चणे, 4 छोटे चमचे मीठ, वेलच्या, दालचिनी आणि लवंगा घालून 20 मिनिटे शिजवा. कुकर उघडून पाणी निथळून राखून ठेवा. उरलेलं मीठ डाळिंबाचे दाणे, जीरे, कोथिंबीर, काळी मिरी, गरम मसाला आणि कैरी पूड घाला. तव्यात तेल आणि तूप धूर निघेपर्यंत गरम करा आणि ते चण्यांवर सारखे ओता. चणे शिजवलेलं पाणी घाला. चणे असलेला कुकर मध्यम आचेवर ठेवा आणि पाणी आटून जाईपर्यंत आणि तेल वेगळे सुटेपर्यंत शिजवा. अधून मधून ढवळत रहा. चणे वाढायच्या भांड्यात काढून घ्या. कांदा आणि लिंबासह गरम गरम वाढा.