मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Updated : बुधवार, 19 मे 2021 (21:20 IST)

मसालेदार चविष्ट अंडा करी

साहित्य - 
4 कडक उकडलेली अंडी ,2 कांदे,1 टोमॅटो,2 चमचे हरभराडाळीचे पीठ,1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर,1 चमचा तिखट,2 चमचे धणेपूड,1 चमचा जिरेपूड,1 चमचा गरम मसाला,चिमूटभर हळद,4 चमचे तेल, आणि चवीप्रमाणे मीठ.
 
कृती -
कांदा आणि टोमॅटो चिरून घ्या. अंडी तिन्ही बाजूने कापून घ्या.एका भांड्यात जिरेपूड,धणेपूड,तिखट,हळद,गरम मसाला मिसळून त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. 
एका पॅनमध्ये तेल तापत ठेवा आणि त्यात कांदा तपकिरी होई पर्यंत परतून घ्या. या मध्ये हरभराडाळीचे पीठ घालून खमंग तपकिरी रंग येई पर्यंत परतून घ्या.आता त्यात मसाल्यांची पेस्ट घाला. एक मिनिट पर्यंत ढवळा आणि हिरवी कोथिंबीर आणि अंडी, टोमॅटो घालून उकळू द्या. त्यातील तेल वर सुटले की गॅस बंद करा. अंडा करी तयार. गरम अंडा करी पोळी किंवा पराठ्यासह सर्व्ह करा.