बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फोटोदुनिया
Written By वेबदुनिया|

वायएसआर

PR
सामान्‍यांचा नेता म्हणून नेहमीच त्‍यांच्‍यात मिसळणारे आंध्रप्रदेशचे मुख्‍यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी हे शेतकरी कुटुंबातून पुढे आल्‍यानेच त्यांना गरीबांबद्दल विशेष कणव होती. त्‍यांनी आपल्‍या मुख्‍यमंत्री पदाच्‍या दोन वेळच्‍या कारकिर्दीत शेतकरी व कष्‍टक-यांसाठी अनेक कल्‍याणकारी योजना अंमलात आणल्‍या. आपल्‍या निवडणूक प्रचार अभियानात सरळ सामान्‍यांमध्‍ये मिसळणारे 'वायएसआर' अशाच एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशातील पारंपरिक आदिवासी फेट्यात.

कुठलीही निवडणूक सहज जिंकणारे वायएसआर पराभवाचाही पराभव करतील असे त्‍यांचे चाहते म्हणत मृत्यूचा पराभव ते करू शकले नाही. 2 सप्‍टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्‍ह्यातील गल्‍ला मल्‍ला जंगलात त्यांचे हेलिकॉप्‍टर कोसळून त्यात त्‍यांचा मृत्यू झाला.