रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By आय. वेंकटेश्वर राव|

दक्षिणेतील कनक दुर्गा माता

WDWD
कनक दुर्गेश्वरी देवी ही इंद्रकिलाद्री पर्वताच्या शेंड्यावर वसलेली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे विराजमान झालेली कनकदुर्गा ही दक्षिणेतील प्रमुख देवता म्हणून प्रसिध्द आहे. प्राचीन काळापासून भाविक येथे नियमित दर्शनासाठी गर्दी करतात. देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी वर्षभरात लाखो भाविक मंदिराला भेट देतात. नवरात्रोत्सवात तर गर्दीचा विक्रम होतो. विशेष पूजा करण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.

कनक दुर्गा मातेचे मंदिर इंद्रकिलाद्री पर्वतावर अगदी उंचावर वसले आहे. खालून वाहणारी कृष्णा नदी वातावरणाचे पावित्र्य आणखी वाढविते. कनकदुर्गेला स्वयंभू देवता म्हणून संबोधले जाते. म्हणूनच तिची प्रभावशक्ती मोठी असल्याचे मानले जाते.

याच जागी शिवाने पांडवांपैकी अर्जुनाला पशुपती अस्त्र दिले होते. या मंदिराची स्थापना अर्जुनाने केली, अशी श्रद्धा आहे. आदी शंकराचार्यांनी या ठिकाणी भेट देऊन श्री चक्राची प्रतिष्ठापना केली आणि वैदिक पद्धतीने कनकदुर्गा देवीच्या पूजेची परंपरा सुरू केली.

या देवीसंदर्भात पौराणिक कथाही आहे. देवी
WDWD
देवतांकडून प्राप्त झालेल्या वरामुळे असुरांनी ऋषीमुनींच्या आश्रमात धुडगूस घालायला सुरवात केली. त्यावेळी देवी पार्वतीने असुरांचा नाश करण्यासाठी विविध अवतार घेतले. शंभू व निशंभूला मारण्यासाठी कौशिका, महिषासूरला मारण्यासाठी महिषासूरमर्दिनी, दुर्गासूराला मारण्यासाठी दुर्गादेवी. कनक दुर्गेने किलुंदू या आपल्या भक्ताला पर्वताचे रूप घेण्यास सांगितले. अशा प्रकारे किलाद्री हे दुर्गेचे निवासस्थान बनले.

याच देवीने महिषासूराला मारण्यासाठी महिषासूराचा अवतार घेतला. अष्टहात, त्यात विविध शस्त्रे, सिंहावरून जाणारी ही महिषासूरमर्दिनी आहे. या पर्वताला लागूनच शिवाने ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास्तव्य केले आहे. ब्रह्मदेवाने शिवाची भक्ती येथेच केली. त्याला म्हणून त्याला मल्लेश्वर स्वामी हे नाव पडले.

देवाचा राजा इंद्र याने या पर्वताला भेट दिली होती. म्हणून त्याला इंद्रकिलाद्री हे नाव मिळाले. येथे दुर्गा मल्लेश्वराच्या उजव्या बाजूला आहे. एरवी पुरूष देवतेच्या डाव्या बाजूला स्त्री देवता असते. म्हणूनही हे स्थान इतरांपेक्षा वेगळे आहे.

WDWD
कनक देवीला नवरात्र उत्सवातील नऊ दिवस बालत्रिपुरसुंदरी, गायत्री, अन्नपुर्णा, महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गादेवी, महिषासूर मर्दिनी, राजेश्वरी देवी या देवीच्या रूपात सजविले जाते. विजया दशमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. विजयादशमीला देवीच्या मूर्तीला हंसाच्या आकाराच्या बोटीत बसवून कृष्णा नदी नेले जाते. याला 'थेप्पोत्सवम' असे म्हणतात. या दिवशी आयुध पूजाही केली जाते. या ठिकाणी भाविकांची संख्या दर वर्षी वाढतच आहे. म्हणूनच यंदा जवळपास 40 कोटीचे वार्षिक उत्पन्न मंदिराकडे जमा झाले आहे. या मंदिराच्या आवारात ठिकठिकाणी शिवलीला व शक्तीमहिमा वर्णिलेला आहे.

मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग-
विजयवाडा शहरात हे मंदिर रेल्वे स्टेशनापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. हे शहर हैदराबादपासून 275 किलोमीटरवर आहे. हे शहर रस्ता, रेल्वे व हवाई सेवेने पूर्ण देशाशी जोडले आहे.