सैलानाचे महाकेदारेश्वर मंदिर
- गायत्री शर्मा
|
| WD |
हे मंदिर जवळपास २७८ वर्ष जुने आहे. येथील शिवलिंगही नैसर्गिक आहे. येथे एकच शिवलिंग होते, असे सांगितले जाते. १७३६ मध्ये सैलानाचे महाराज जयसिंह यांनी येथे एक सुंदर मंदिर बांधले. तेच केदारेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले.
राजा दुलेपसिंह यांनी या मंदिराचा पुढे जीर्णोद्धार केला. मंदिराच्या जवळ असलेल्या कुडांसाठी त्यावेळी दीड लाखाचा खर्च केला. पुढे राजा जसवंतसिहांनी मंदिराच्या पुजार्याचा चरितार्थ चालावा यासाठी जमीन दान केली. १९९१-९२ मध्ये पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला.
| WD |

