शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

घरातील प्रत्येक कोपऱ्यातून निघतात का झुरळ? स्वयंपाकघरातील हे मसाले शिंपडावे दिसतील परिणाम

Cockroach
तुम्ही देखील घरात इकडे तिकडे फिरणाऱ्या झुरळांपासून त्रस्त आहेत का? तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या समस्येवर उपाय. तर चला जाणून घेऊया. 
 
तेज पान- 
मसाल्याचा हा पदार्थ झुरळ पळवण्यासाठी खूप मदत करतो. तेज पान बारीक करून झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवावे. तेज पानाच्या वासाने झुरळ येणार परत कधीच येणार नाही.  
 
बेकिंग सोडा- 
झुरळांवर रामबाण उपाय आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा फक्त झुरळच नाही तर इतर किडे देखील नष्ट करतो. एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये साखर घालावी व पाणी घालून त्याच्या छोट्या गोळ्या बनवून घ्याव्या. झुरळ ह्या गोळ्या खाऊन नष्ट होतील.
 
कडुलिंब- 
घरघुती उपाय मध्ये नेहमी कडुलिंबाचा उपयोग केला जातो. कडूलिंब वाळवून त्याची पावडर बनवून घ्यावी.  ही पावडर झुरळ जिथून येतात तिथे टाकावी. तसेच ही पावडर पाण्यामध्ये घालून हे पाणी स्प्रे बाटलीत भरावे व झुरळ दिसल्यास त्यावर स्प्रे करावा. यामुळे झुरळ नष्ट होतील.
 
कांदा, मिरे पूड आणि लसूण-
कांदा बारीक करून त्यामध्ये लसूण बारीक करून घ्यावा. व त्याच प्रमाणात मिरे पूड घालावी. या पेस्टला पाण्यामध्ये मिक्स करून लिक्विड तयार करावे. हे लिक्विड झुरळ सोबत अनेक किड्यांचा नायनाट करण्यास मदत करते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik