शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (18:09 IST)

चविष्ट आणि आरोग्यवर्धक सातूचे लाडू

Delicious and healthy sweet satu laddu recipe in marathi
असं म्हणतात की अक्षय तृतीयेला भगवान विष्णू यांना सातूच्या लाडवाचा नैवेद्य दिला की ते प्रसन्न होतात.सातू हे उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला थंडावा देखील देतो.पौष्टीक असे हे सातूचे लाडू आरोग्यवर्धक आणि पौष्टीक असतात. चला तर मग हे लाडू बनवायचे साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
250 ग्रॅम सातूचे पीठ,250 ग्रॅम पिठी साखर,100 ग्रॅम साजूक तूप, 1 चमचा वेलची पूड, एक पाव सुखेमेवे बारीक केलेले,बदाम.
 
कृती -
एका परातीत सातूचे पीठ चाळून घ्या.साजूक तूप वितळवून घ्या आणि  सातूच्या पिठात तूप,वेलची पूड,पिठीसाखर घाला हे मिश्रण एक सारखे मिक्स करा. या मध्ये सुखे मेवे घाला आणि गोल लाडू बांधा. नैवेद्य म्हणून देवाला द्या. 
टीप - आपली इच्छा असल्यास प्रत्येक लाडवावर एक-एक बदाम देखील लावू शकता.