1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (13:39 IST)

Dates Laddu खजूराचे लाडू

साहित्य- 
1 कप खजूर
1 कप कद्दूकस केलेलं कोरडं नारळ
2 मोठे चमचे काजू
2 मोठे चमचे बादाम
2 मोठे चमचे मनुका
1/4 लहान चमचा वेलची पूड
1 मोठा चमचा खसखस
1 मोठा चमचा तुप
 
कृती-
खजूराच्या बिया काढून त्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्या. काजू आणि बादाम देखील ओबडधोबड वाटून घ्या. एक कढईत तुप गरम करुन त्यात खजूर घालून 4-5 मिनिटापर्यंत मंद आचेवर भाजून घ्या आणि नंतर काजू आणि बादाम मिसळून काहीवेळ अजून भाजून घ्या.
 
कद्दूकस केललं नारळ, खसखस, वेलची पूड मनुका मिसळून गॅस बंद करुन द्या. जरा गार झाल्यावर 12-15 भागांमध्ये वाटून लाडू तयार करुन घ्या. गार झाल्यावर डब्यात भरा.