गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

पौष्टिक पुर्‍या

साहित्य : एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दूध, पन्नास ग्रॅम साखर, पन्नास ग्रॅम गूळ, पाव वाटी रिफाईंड तेल, पाच बदाम, दहा काजू, दहा बेदाणे (बारीक काप केलेले), अर्धा चमचा वेलदोडा पूड, 25 ग्रॅम ओल्या नारळाचा चव इत्यादी. 
 
कृती : सर्वप्रथम साखर आणि गुळाचा एकतारी पाक करवा. परातीत रवा आणि कणीक मिसळून घ्यावी. या मिश्रणात रिफाईंड ऑईल मिसळून घ्यावं. आता या मिश्रणात बदाम, काजू, बेदाणे यांचे तुकडे घालावे. ओल्या नारळाचा चवही घालावा. त्यानंतर पाक घालून कणीक चांगली मळून घ्यावी. कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांचया पुर्‍या लाटून घ्याव्या. कढईत तेल गरम करून घ्यावं. गरम तेलात पुर्या लालसर रंगावर तळून घ्याव्या. टेस्टी रवा पुर्‍या तयार आहेत.