गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

मुगाच्या डाळीचा हलवा

साहित्य :  2 वाट्या मुगाची डाळ, 2 वाट्या साखर, 3 वाट्या दूध, 1 1/2 वाटी तूप, 150 ग्रॅम खवा, 7-8 वेलदोड्याची पूड, 25 ग्रॅम बेदाणा, थोडा पिवळा रंग. 
कृती : मुगाची डाळ भिजत घालून वाटावी. नंतर वाटलेल्या डाळीत 2 वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे. 
 
मग त्यात रंग घालावा. नंतर साखर घालून मिश्रण जरा घट्ट झाले की उतरावे. नंतर त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. खव्यामध्ये 1 वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा. आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा गालून सर्व्ह करावे.