शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुनुसार दुकानाचे प्रवेश द्वार उत्तरेस असावे

वास्तुनुसार 'आकृति/आकार', 'सर्वांगिण भरभराटीसाठी दुकानाची चांगली बांधणी हवी म्हणून प्लॉट चौरस किंवा चतुष्कोणीय असावा.
 
भोवताली चौरस किंवा चतुष्कोणीय दुकाने व्यापारासाठी शुभलक्षणी ठरतात. जमीनीच्या तळाचा उतार उत्तरेस, पूर्व‍ दिशेकडे किंवा ईशान्येकडे असावा. 
 
दुकानाचे मुख्य प्रवेश दार उत्तरेस, ईशान्येकडे किंवा पूर्व दिशेकडे असावे. हिरवा, नारंगी किंवा नीळा रंग दुकानाच्या भिंतीना अनुकूल असेल.
 
वाहने उभे करण्याची जागा दुकानाच्या पूर्वेस किंवा उत्तर दिशेकडे राखून ठेवण्यात यावी. दुकान चतुष्कोणीय असले तर लांबी आणि रूंदीचे प्रमाण 1 : 2 असावे.
 
दुकानाच्या पुढील भागाची रूंदी मागिल भागापेक्षा कमी असेल तर त्यास  'गौ-मुखी' म्हणून संबोधले जाते. असा आकार व्यवसायासाठी  शुभलक्षणी असत नाही.