शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By मनोज पोलादे|

मायक्रोवेव्ह स्पेशल दम आलू

साहित्य - २५0 ग्रॅम लहान बटाटे, २ टोमॅटो, २ मध्यम कांदे, २ टे. स्पू. आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे-जिरेपूड, मीठ, तेल, हळद, कसुरी मेथी, २ टे. स्पू. साय, अर्धी वाटी दही, १ टी. स्पू. गरम मसाला.

कृती - टोमॅटो-कांद्याची पेस्ट करा. बटाट्याची साले काढून टोचून घ्या. मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमध्ये बटाटे लावून वरून थोडे तेल शिंपडा. हायवर (१00 टे) १0 मिनिटे ठेवा. ग्रेव्हीसाठी कांदा-टोमॅटो पेस्ट, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, दही, गरम मसाला व २ टे. स्पू. तेल टाकून एकत्र करून घ्या. हे मिश्रण मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये टाकून हायवर (१00 टे) चार-पाच मिनिटे ठेवा. तेल सुटल्यावर बटाटे, कसुरी मैथी, १ वाटी पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करा. वरून साय टाका. हायवर २ मिनिटे ठेवून बाहेर काढून चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम खायला द्या.