शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (16:52 IST)

Bihari Style आलू चोखा

4 बटाटे उकळा. चांगले मॅश करा. आता त्यात मीठ घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घाला. थोडीशी लाल मिरची पावडर घाला. आता त्यात एक चमचा मोहरी तेल घाला. भरलेल्या मिरचीचे लोण असल्यास त्यातील जरा मसाला घालून चांगले मॅश करा. आपणास हवे असल्यास आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता. तुमचा चोखा तयार आहे.
 
जर तुम्हाला कच्चे तेल घालायचं नसेल तर कढई गरम करून त्यात तेल घाला. त्यात एक चिमूटभर हिंग, मोहरी आणि लाल तिखट घाला. तेल गरम झाल्यावर मॅश केलेल्या बटाट्यावर टाका. या आलू चोखाला वरण-भात, चटणी बरोबर सर्व्ह करा. ही रेसिपी चवदार तसेच आरोग्यदायी आहे. जर आपण अद्याप खाल्लेले नाही, तर नक्कीच करून पहा.