गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

कॉर्न टोमॅटो ऑम्लेट

साहित्य : दोन ते तीन मक्याची कणसे, दोन टोमॅटो, एक ते दोन वाट्या डाळीचे पीठ, दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे जिरेपूड, दोन चमचे बडीशेप पूड, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल.

कृती : कणसाचे दाणे काढून मिक्सरमधून वाटून घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. नंतर कणसाची पेस्ट, टोमॅटो पेस्ट, डाळीचे पीठ, हिरवी मिरची पेस्ट, बडीशेप,  जिरेपूड, मीठ, कोथिंबीर घालून पीठ धिरड्यासाठी भिजवतो तसे जाडसर भिजवावे.