1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

व्हेजिटेबल हक्का नूडल्स

साहित्य - 250 ग्रॅम नूडल्स, 50 ग्रॅम कोबी, 25 ग्रॅम गाजर, दोन सिमला मिरच्या, 25 ग्रॅम फरस बीन, 25 ग्रॅम कांदा पात, आठ-दहा लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, चिली सॉस, सोया सॉस, मिरेपूड, टोमॅटो सॉस, तेल.

कृती - सर्वप्रथम नूडल्स पाण्यात उकडावे. उकडताना पाण्यात एक चमचा तेल घालावे. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाही. नूडल्स शिजल्यानंतर चाळणीत गाळून टेबलावर थंड होण्यासाठी पसरावे. तेल घालून मिक्स करावे. कोबी, गाजर, सिमला मिरच्या, फरस बीन, कांदापात पातळ लांबट कापून घ्यावे. एका कढईत तेल घालून गरम करून त्यात लसूण, कापलेल्या भाज्या घालून परतावे. चिली सॉस- सोया सॉस, टोमॅटो सॉस- मिरेपूड- मीठ मिक्स करून नूडल्स घालून हलवावे. चवदार हक्का नूडल्स तयार आहे.