खुसखुशीत,चविष्ट पास्ता चीझ बॉल  
					
										
                                       
                  
                  				  चहा बरोबर काही वेगळेसे खावे वाटते तर खुसखुशीत पास्ता चीझ बॉल नक्की बनवा. हे मुलांना खूप आवडेल.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
				  													
						
																							
									  
	 
	1 कप शिजवलेला पास्ता,1 कप किसलेले चीझ,लोणी,5 चमचे मैदा, दीडकप दूध,कोथिंबीर,मीठ चवीप्रमाणे, हिरव्यामिरच्या,ब्रेड क्रम्ब्स,तेल तळण्यासाठी.
				  				  
	सारण साठी साहित्य-
	1 /2 कप मैदा,3/4 कप पाणी,
	 
	कृती-   
	ऐका पॅनमध्ये लोणी गरम करा त्यात मैदा मंद आचेवर भाजून घ्या.त्यात दूध घालून ढवळा जेणे करून त्यात गुठळ्या होणार नाही.हे थंड झाल्यावर पास्ता,चीझ,कोथिंबीर,हिरव्यामिरच्या मीठ घालून मिक्स करा.या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करा.एका वाटीत मैद्याचे घोळ तयार करा.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	कढईत तेल तापत ठेवा,तेल तापल्यावर तयार गोळे मैद्याच्या घोळात बुडवून ब्रेड क्रम्ब्स मध्ये गुंडाळा आणि गरम तेलात सोडा.तांबूस रंग येई पर्यत तळून घ्या.गरम खुसखुशीत पास्ता चीझ बॉल सॉस सह सर्व्ह करा.