शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (21:02 IST)

चविष्ट बेबी कॉर्न मंच्युरियन रेसिपी

मंच्युरियन हे मुलांना हमखास आवडते मंच्युरियन साठी लागणारे सॉस किंवा ग्रेव्ही कसे बनविले जाते हे शिकल्यावर आपण सहजच घरी आपल्या आवडीचे मंच्युरियन बनवू शकता. आज बेबी कॉर्न मंच्युरियन कसे बनवतात हे जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
10 ते 12 बेबी कॉर्न, 1/4 कप कॉर्न फ्लोर, अडीच चमचे मैदा, 1 लहान चमचा आलं-लसूण पेस्ट, 1/2 चमचा सोयासॉस, मीठ चवीप्रमाणे,1/4 कप पाणी, तेल तळण्यासाठी.    
 
सॉस साठी साहित्य -
1 लहान चमचा आलं बारीक चिरलेले, 1 लहान चमचा बारीक चिरलेले लसूण, 1-2 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या, 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 1/2 ढोबळी मिरची लांब चिरलेली, दीड चमचा सोया सॉस, 1/4 कप बारीक चिरलेली कांद्याची पात, दीड चमचा रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप, 1/4 काळीमिरपूड, 1 चमचा कॉर्न फ्लोर 2 चमचे पाण्यात घोळून घ्या. 1 चमचा तेल, मीठ चवीप्रमाणे.      
 
कृती -
बेबी कॉर्न मोठ्या तुकड्यात कापून घ्या. मध्यम आकाराच्या भांड्यात कोर्नफ्लोर, मैदा, आलं लसूण पेस्ट, सोयासॉस आणि मीठ पाण्यात घालून घोळ बनवा आणि ढवळून घ्या. या मध्ये गाठी होऊ देऊ नका. चिरलेले बेबी कॉर्न या मध्ये घाला.
कढईत तेल घालून तापत ठेवा आणि त्यामध्ये हे बेबी कॉर्न मैद्याच्या घोळात घालून सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.
 
सॉस बनविण्यासाठी -
एका कढईत मोठ्या गॅस वर 1 चमचा तेल घाला आणि त्यामध्ये बारीक चिरलेले आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घाला. परतून घ्या. चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्या. कांद्याची पात रेडचीली सॉस, सोयासॉस टोमॅटो केचप आणि काळीमिरपूड घाला आणि मिसळा. पाण्यात घोळलेले कोर्नफ्लोर घाला आणि शिजवून घ्या. तळलेले बेबी कॉर्नचे तुकडे घाला. साहित्य मिसळा आणि  2 मिनिटे शिजवून घ्या.  
 गरम बेबीकॉर्न मंच्युरियन खाण्यासाठी तयार.