शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (22:55 IST)

चविष्ट पोहे पनीर रेसिपी

healthy delicious PANEER POHA RECIPE in marathi  yasty paneer poha recipe
साहित्य- 
200 ग्रॅम पोहे, 1 चमचा तेल, 170 ग्रॅम पनीर, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा हिरव्या मिरच्या, 6 -7 कडी पत्ते, 1 चमचा काजू, 1 कांदा, 1 चमचा मीठ,1/4 चमचा हळद,1 चमचा साखर, 2 चमचे लिंबाचा रस, कोथिंबीर, पाणी.
 
कृती 
     
एका भांड्यात पोहे घालून भिजत ठेवा. एका पॅन मध्ये तेल घालून गरम करा त्या मध्ये पनीर घालून 8 -10 मिनिटे सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. हे काढून ठेवा. कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे हिरव्या मिरच्या कडीपत्ता, पनीर ,काजू घालून परतून घ्या. आता कांदा घालून सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या.मीठ, हळद घाला आता धुतलेले पोहे घालून मिसळा साखर,लिंबाचा रस कोथिंबीर घालून मध्यम आचेवर शिजवा आणि एक वाफ देऊन काढून घ्या.गरम पनीर पोहे खाण्यासाठी तयार.