1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

शिल्लक राहिलेल्या पोळीपासून बनवा चटपटीत डिश, लिहून घ्या रेसिपी

Muttai Chapati
अनेक वेळेस जेवण खूप बनवले जाते.अश्यावेळेस जर पोळी शिल्लक असल्यास काय करावे आज आपण पाहणार आहोत. उरलेल्या पोळीपासून आपण दोन रेसिपी बनवू शकतो, जी चवीला देखील खूप स्वादिष्ट लागते. 
 
पोळीचा पिज्जा 
पोळीचा पिज्जा बनवण्यासाठी माँजरेला चीज किसून घ्यावे आणि मग  कांदा, शिमला मिरची कापून घ्यावी. यासोबतच स्वीटकॉर्न देखील वाफवरून घ्यावे. तुम्ही या पिज्जामध्ये पनीर, मशरूम सारखे पदार्थ घालू शकतात. आता हा पिज्जा बनवण्यासाठी शिल्लक राहिलेली पोळी घ्यावी. मग यावर पिज्जा सॉस किंवा टोमॅटो केचप लावावे. मग थोडेसे चीज टाकावे. आता भाज्या, स्वीट कॉर्न, पनीर यावर सजवावे. तव्यावर बटर लावून हा पोळी पिज्जा शेकावा. मग यावर चिली फ्लिक्स घालावे. तसेच ऑरिगेनो घालून चार भागांमध्ये कट करून सर्व्ह करावा. 
 
चटपटीत स्नॅक्स 
चटपटीत स्नॅक्स बनवण्यास थोडेसे बेसन घोळ तयार करावा. तसेच उकडलेले बटाटे घ्यावे. यामध्ये मसाले घालावे. तसेच कांदा, टोमॅटो, शिमला मिरची बारीक कापून घ्यावी. आता पोळीवर हे मिश्रण लावावे. व यावर बेसनचा घोळ लावावा. तसेच दोन्ही बाजूंनी तव्यावर शेकून घ्यावे. तसेच यावर मग शेव टाकून सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik