दिवाळी विशेष चटपटीत काजू-बदामाचे लोणचे
आज पर्यंत आपण अनेक प्रकारचे लोणचे पहिले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? काजू बदामाचे देखील लोणचे बनवले जाते. जे चवीला तर स्वादिष्ट लागतेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर चला जाणून घेऊ या काजू बदामाचे लोणचे बनवावे कसे, जाणून घ्या रेसिपी.
साहित्य-
एक कप काजू
एक कप बदाम
एक चमचा काळे मीठ
एक चमचा बडीशेप
एक चमचा काश्मिरी लाल तिखट
एक चमचा गरम मसाला
अर्धा चमचा हळद
एक चमचा जिरे
एक चमचा मीठ
दोन चमचे आमसूल पावडर
250 ग्रॅम साखर
चार वेलची
एक लिंबाचा रस किंवा एक चमचा व्हिनेगर
कृती-
सर्वात आधी एक कढई गॅस वर ठेऊन त्यामध्ये एक कप पाणी घालावे. व साखर घालावी. आता तयार होणाऱ्या पाकमध्ये वेलची पूड घालावी. व हा पाक उकळवून घ्यावा. आता यामध्ये काजू बदाम घालावे. व हे मिश्रण शिजवून घ्यावे. आता यामध्ये सर्व मसाले टाकून शिजवून घ्यावे. काजू बदाम शिजले का हे पाहून घ्यावे. जेव्हा हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल तेव्हा गॅस बंद करावा. हे लोणचे थंड होण्याकरिता ठेवावे. तसेच लोणचे थंड झाल्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकावा तर चला तयार आहे काजू बदामाचे आंबट गोड लोणचे जे तुम्ही पराठा किंवा पुलाव सोबत देखील सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik