शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (13:53 IST)

तवा आलू मसाला

सामुग्री
5 उकळलेले बटाटे
1 कांदा
1/2 चमचा आलं पेस्ट
1/2 चमचा लसूण पेस्ट
2 टॉमेटोची प्यूरी
1/2 चमचा गरम मसाला
1/2 चमचा कसूरी मेथी
1/4 चमचा हळद
1/2 चमचा लाल तिखट
1 चमचा धणेपूड
1/2 चमचा चाट मसाला
1/2 चमचा जीरे
हिरवी कोथिंबीर
तेल
चवीप्रमाणे मीठ
 
कृती
सर्वात आधी कढईत तेल गरम करुन त्यात बटाटे कापून शेलो फ्राय करुन घ्या. त्यात सर्व मसाले टाकून गोल्डन ब्राऊन झाल्यावर गॅसवरुन काढून घ्या. आता एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करुन त्यात लसूण-जीरा, आलं आणि चिरलेला कांदा घालून फ्राय करा. नंतर टॉमेटो प्युरी टाकून शिजवून घ्या. आता फ्रायड बटाटे आणि मेथी व गरम मसाला घालून काही मिनिटांसाठी कमी आचेवर राहू द्या. तवा आलू तयार आहे. आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून सर्व्ह करा.