रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2024 (18:06 IST)

मुंबईत अपघात : होळी खेळण्यासाठी गेलेले ५ तरुण समुद्रात बुडाले, एकाचा मृत्यू

water death
मुंबईतील माहीम चौपाटी समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर पाच मित्र समुद्रात आंघोळीसाठी गेले होते, असे सांगितले जात आहे. मात्र भरती-ओहोटीमुळे ते बुडाले. मात्र चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकाने चार तरुणांना वाचवून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले.
 
काल संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या पाचव्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र रात्री अंधार आणि भरती-ओहोटीमुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी पुन्हा तरुणाचा मृतदेह सापडला.
 
सोमवारी पाच मुले माहीम समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेली होती. होळी खेळल्यानंतर ते माहीम ते शिवाजी पार्क किनाऱ्यादरम्यानच्या समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात भरती-ओहोटी होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. काही खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले, हे पाहून बाकीचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पाचही जण समुद्रात बुडू लागले. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. तर एका तरुणाबाबत काहीही सापडले नाही.
 
बचावलेल्या चार तरुणांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारपैकी दोघांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. एकावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष किंजळे (१९) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून माहीम येथे राहतात.