गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2024 (16:44 IST)

बापाच्या कुशीतून निसटलं बाळ; झाला मृत्यू

राजधानी रायपूरच्या सिटी सेंटर मॉलमध्ये मंगळवारी रात्री 8 वाजता झालेल्या एका भीषण अपघातात दीड वर्षाच्या मुलाचा दुसऱ्या मजल्यावरून वडिलांच्या कडेवरून पडून मृत्यू झाला. वडील आपल्या 5 वर्षाच्या दुसऱ्या मुलाला एस्केलेटरवर चढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.गोंधळात लहान बाळ वडिलांच्या हातातून निसटून खाली पडले.
 
 झाले असे रायपूरच्या एका मॉल  मध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन शॉपिंग करण्यासाठी आला होता. त्या व्यक्तीच्या कडेवर एक लहान मुलहोते. एस्केलेटरवर चढण्यासाठी त्याव्यक्तीने मुलाला मदत करण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच्या हातातून निसटून कडेवरचे बाळ खाली पडले. या अपघातानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही व्हिडीओ मध्ये कैद झाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit