रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (12:04 IST)

पत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या

नवी मुंबई- एका बापाने रागाच्या भरात आपल्याच चार वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक तीनवर या निर्दयी बापाने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून त्याची हत्या केली. 
 
नमकं काय घडलं
आरोपी बाप भटक्या कुटुंबातील असून त्याचं आणि त्याच्या दुसर्‍या पत्नीचे नेहमी वाद होत होते. हे दोघे भांडत रेल्वे स्टेशनावर पोहोचले. फलाटावर एकत्र चालत असताना देखील पती- पत्नीचा वाद सुरु होता. तेव्हा रागाच्या भरात पतीने आपल्या पहिल्या पत्नीकडून स्वतःच्या चार वर्षांचा मुलाला उचलून फलाटावर आपटले. या निर्दयी बापाने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून त्याची हत्या केली. 
 
असे कृत्य करताना काही लोकांनी त्याला अडविण्याचाही प्रयत्नही केला परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने आपटत होता. हा क्रूर प्रकार थांबविण्याचा प्रयत्न करत करुनही बाप चिमुकल्याला आपटत राहिला, ज्याने मुलगा जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
 
मृत मुलगा हा आरोपीच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा होता. त्याची पहिली पत्नी गावी असते आणि तो दुसऱ्या पत्नीसोबत नवी मुंबईत सानपाडाला राहत होता. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मुलाची हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी यांनी अटक केली आहे.