सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (15:41 IST)

490 स्मार्टफोनची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

arrest
मुंबई शहरातील राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले स्मार्टफोन देशातील विविध राज्यांत विक्री करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आज करण्यात आलेल्या मानखुर्द येथील कारवाई मध्ये 480 स्मार्टफोन तसेच गांजा, देशी-विदेशी दारू तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांकडून 74 लाख 78 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मानखुर्द येथे सापळा रचून स्मार्टफोनची चोरी करून विकणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई या ठिकाणी अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्याचे 490 स्मार्ट फोन ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये 41 अॅपल कंपनीच्या मोबाईल फोनचा देखील समावेश आहे. 1 लॅपटॉप हिटरमशीन, हिटरगन असे साहित्यासोबतच 9 कि. 720 ग्रॅम वजनाचा गांजा, देशी-विदेशी दारूच्या एकूण 174 बाटल्या, 2 तलवारी अशी एकूण 74 लाख 78 हजार 522 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.