शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (19:03 IST)

मॉल मध्ये घसरगुंडी खेळताना चिमुरडीचा दारुण अंत

रविवारी आई-बाबा सोबत मॉलला फिरायला गेलेल्या चिमुरडीचा घसरगुंडी खेळताना चिमुरडीचा दारुण अंत झाल्याची घटना घाटकोपरच्या 'नील योग मॉलच्या झेनॉक्स प्लेस स्पेस येथे घडली आहे. या मॉल मध्ये चेंबूरच्या टिळक नगर परिसरात राहणाऱ्या वर्मा कुटुंबातील साडेतीन वर्षाची दालिशा वर्मा आपल्या आई-वडिलांसह रविवारी मॉल मध्ये फिरायला गेली. मॉल मध्ये किड्सझोन मध्ये घसरगुंडीवर खेळताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली नंतर तिला चक्कर आली तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या बाबत पंतनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे.  
 
Edited By - Priya Dixit