म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’सुरू करणार

mucormycosis
Last Modified शुक्रवार, 14 मे 2021 (07:56 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्याने त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे व एमएमआर क्षेत्रात या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना कसा दिलासा देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. त्याशिवाय या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकता असल्यामुळे ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याशिवाय या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचे देखील निश्चित करण्याचे करण्यात आले.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण
21 जूनपासून (सोमवार- उद्यापासून) देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणं शक्य ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा जुळवून घ्या
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ...

बाप माणूस

बाप माणूस
बाप माणूस हा सूर्य सारखा असतो

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ...

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ते महानगर असा प्रवास कसा केला?
जान्हवी मुळे सन 1947. फाळणीनंतरचे दिवस. स्वातंत्र्याचा आनंद मागे पडला होता. नव्यानं ...