सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:41 IST)

तब्बल २५ तबलिगी समाजातील लोकांना अटक, दिल्लीतील कार्यक्रमात होता सहभाग

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा डायघर भागातून ठाणे गुन्हे शाखा तब्बल २५ तबलिगी समाजातील लोकांना अटक केली आहे. यामध्ये काही बांग्लादेशी तर काही मलेशियन नागरिक आहेत. हे सगळे दिल्ली येथील मरकज धार्मिक कार्यक्रमात सहमभागी झाल्याची माहिती आहे. हे दिल्लीतून येथे आल्याची माहिती आहे. दरम्यान, यातील २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या सगळ्यांना अटक केल्यानंतर आज त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे.