बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (22:56 IST)

अजित पवारांना मोठा धक्का ! मुलगा पार्थ यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिंरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आज सकाळपासून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे  टाकण्यात येत आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
 
 अजित पवार आयकर विभागाच्या रडावर आहेत.पार्थ पवार यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यापूर्वी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर छापा टाकण्यात आला होता.त्यापैकी एक बहीण कोल्हापूर तर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत.यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावर विभागाची छापेमारी सुरु आहे.आयकर विभागाने काही साखर कारखान्यांवर छापे  टाकले असून हे कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तींयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
कारखान्याच्या संचालकांच्या घरावर छापे
राज्यातील दौंड शुगर, अंबालिका शुगर्स , जरंडेश्वर , पुष्पगनतेश्वर नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले.या सर्व कारखान्यांचे संचालक अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली.