बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:25 IST)

फडणवीस यांच मुंबईत जोरदार स्वागत 'असं' होणार

गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस  यांच आज  मुंबईत जोरदार स्वागत होणार आहे. सकाळी एअरपोर्टवर भाजपचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पोहचणार आहेत. मुंबई एअरपोर्ट ते भाजप कार्यालय येथे सर्व आमदारांचा ताफा फडणवीसांच्या स्वागतासाठी पोहोचणार आहे.  
 
भाजपचे 106 आमदार भाजपला गोव्यात मिळालेल्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचणार आहेत. विधानसभेचं अधिवेशन सुरु असल्याने सर्व आमदार मुंबईतच आहेत. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार यावेळी एअरपोर्टवर पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजप कार्यालयात भाजपच्या विजयाचा उत्सव साजरा होणार आहे. सकाळी 8:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचं एअरपोर्टवर आगमन होणार आहे.