1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 12 मार्च 2020 (15:24 IST)

मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही : राऊत

Madhya Pradesh
मध्य प्रदेशातील राजकीय अस्थितरतेवर भाष्य करताना महाराष्ट्रात आमच्यासारखे सर्जन बसलेत. मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
 
राज्यात जर असे कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला असून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिेंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार अस्थिर बनले आहे.