रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (17:19 IST)

मनसेचे होर्डिंग, आदित्यनाथ यांचा युपीचा "ठग" असा उल्लेख

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बाँलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसीटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बाँलिवूडला न्यायचंय. त्यांच्या या कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यामातून उत्तर दिलंय. 
 
मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हाँटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हाँटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटलंय. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय.
 
कहा राजा भोज...और कहा गंगू तेली... अशा शब्दात मनसेच्या पोस्टरवरुन योगी यांच्यावर टीका करण्यात आलीय. कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र...भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपी ला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं..अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग" अशा शब्दात मुख्यमंत्री योगींवर टीका करण्यात आलीय.