मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:58 IST)

मुंबई महा पालिकेचे ‘वॉर्ड वॉर रूम’ तयार

bed
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्‍यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्ण शय्या मिळवून देणे तसेच गृहविलगीकरणात बाधित असलेल्या रुग्णांना योग्य स्वरूपाचे समुपदेशन करण्यासाठी आता ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी ‘वॉर्ड वॉर रूम’ महत्वाची कामगिरी बजावत आहेत. जून २०२० पासून विकेंद्रित पद्धतीने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी ही कार्यप्रणाली नियमितपणे सुरु आहे. यातून कोविड बाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होत आहे.
 
या ‘वॉर्ड वॉर रूम’ अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे
‘ए’ विभाग ०२२ – २२७०-०००७,
‘बी’ विभाग ०२२ -२३७५-९०२३, २३७५९०२५
‘सी’ विभाग ०२२- २२१९-७३३१,
‘डी’ विभाग ०२२ २३८३-५००४,  ८८७९७१३१३५
‘ई’ विभाग ०२२ २३७९-७९०१,
‘एफ दक्षिण’ विभाग ०२२- २४१७-७५०७,  ८६५७७९२८०९
‘एफ उत्तर’ विभाग ०२२- २४०१-१३८०, ८८७९१५०४४७, ८८७९१४८२०३
‘जी दक्षिण’ विभाग ०२२- २४२१ ९५१५, ७२०८७६४३६०
‘जी उत्तर’ ०२२- २४२१-०४४१, ८२९११६३७३९
‘एच पूर्व’ विभाग ०२२- २६६३-५४००,
‘एच पश्चिम’ विभाग०२२- २६४४-०१२१,
‘के पूर्व’ विभाग ०२२- २६८४-७०००, ८६५७९३३६८१
‘के पश्चिम’ ०२२- २६२०८३८८
‘पी दक्षिण’ विभाग -०२२ २८७८-०००८,  ८८२८४७६०९८ ७३०४७७६०९८
‘पी उत्तर’ विभाग ०२२- ६९६०००००
‘आर दक्षिण’ ०२२- २८०५-४७८८, ८८२८४९५७४०
‘आर उत्तर’ विभाग ०२२- २८९४-७३५०, ८३६९३२४८१०
‘आर मध्य’ विभाग ०२२- २८९४-७३६०, ९९२००८९०९७
‘एल’ विभाग ०२२- २६५०-९९०१,  ७६७८०६१२७४
‘एम पूर्व’ विभाग ०२२- २५५२-६३०१, ७२०८६८०५३८
‘एम पश्चिम’ ०२२- २५२८-४०००,
‘एन’ विभाग ०२२- २१०१-०२०१,
एस विभाग ०२२- २५९५-४०००, ९००४८६९७२४
टी विभाग ०२२- २५६९-४०००.
वर उल्लेखित ‘लँडलाईन’ दूरध्वनी क्रमांकांवर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधावयाचा झाल्यास क्रमांक पूर्वी ‘०२२’ हे आकडे जोडणे आवश्यक ‌आहे)
 
प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या “दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस” अर्थात ‘२४x७’ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉर रुममुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा आणि समुपदेशन दिले जात आहे. गरजू कोरोना बाधितांना तात्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी ‘अधिक लवकर व जलद’ झाला आहे.