1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified बुधवार, 29 मार्च 2023 (22:03 IST)

राष्ट्रवादी नेते अनिल भाईदास पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

anil bhai das patil
ani
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते आणि खान्देशाच्या राजकारणातील बडा चेहरा असलेला नेता अनिल भाईदास पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
 
आमदार अनिल पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोटावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
 
अनिल भाईदास पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. अतिशय अटीतटीची ती लढत ठरली होती. शिवाय, अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. खान्देशातील राजकारणात त्यांनी चांगले स्थान मिळवले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor