संबंधित माहिती
- मुंबई-गोवा महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग
- प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट लुक प्रदर्शित!
- 'प्रभास 20' चे निर्माते येत्या 10 जुलैला सादर करणार चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर!
- कुत्र्याने घेतला चावा, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पंजाबमध्ये मुलाने एका मुलीमुळे आत्महत्या करून आपले जीवन गमावले
तर गुन्हा दाखल करण्यात येणार
कोविड-१९चा प्रादुर्भाव होत असल्याने कल्याण-डोंबिवलीत अगोदर कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे. तसेच धोका लक्षात घेऊन अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, लोकांना क्वारंटाईन करुनही काही जण घराबाहेर फिरताना दिसत असल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेने कडक इशारा देताना गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
लॉकडाऊन असताना रुग्णांची सख्या कमी होत नसल्याने दोन तारखेपासून दहा दिवसाचा पुन्हा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेकडून ज्यांच्या घरात सुविधा आहेत, अशा रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मात्र काही रुग्ण या सुविधेचा गैरफायदा घेत नजर चुकवून घराबाहेर फिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असे रुग्ण सोसायटीच्या सदस्यांना न जुमानता बाहेर पडत असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पुढील लेख
