बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (16:37 IST)

पालघरात बंद घरात तीन मानवी सांगाडे सापडले, हत्याच्या संशय

पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एका बंद घरात तीन मानवी सांगाडे आढळले आहे. हे सांगाडे आई, वडील आणि मुलीचे आहे. या तिघांची हत्या केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. 

सदर घटना वाडा- भिवंडी राज्य महामार्गालगत असलेल्या नेहरोली गावात घडली असून 15 दिवसांपूर्वी घडली असावी तिघांच्या शरीराचे सापळे आढळले आहे. 
"घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली." दार तोडले असता त्यांना ड्रॉईंग रूममध्ये दोन महिलांचे सांगाडे सापडले, तर पुरुषाचे सांगाडे पूर्णपणे कुजलेले होते

वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची अपंग मुलगी या घरात राहत होते तर दाम्पत्यांचे मुले कामा निमित्त वसईत राहत होते. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दार उघडले आणि त्यांना तिघांचे सांगाडे आढळले.

पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले आहे.यांचा मृत्यू कसा झाला? याचा शोध पोलीस घेत असून अज्ञातांविरुद्ध खून, दडपशाही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit