शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 एप्रिल 2021 (08:18 IST)

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची आज बैठक

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत मंगळवारी शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यात वाढत्या कोरोनामुळे कडक  निर्बंध लागू झाल्याने परीक्षा नेमक्या कशा घ्याच्या यावर याबैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइनच झाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहेत. यातच राज्यात  वाढत्या कोरोना संसर्गामुळे 5 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध घोषित करण्यात आले. नव्या निर्बंधांमुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत का? झाल्या तरी कशा त्या पद्धतीने होणार? किंवा झाल्या नाही तर  विद्यार्थ्यांना गुण कसे देणार? अशा अनेक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीत शिक्षण मंडळातील अधिकार्यां्सह चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे सीबीएससी आणि आसीएससी बोर्डासहदेखील चर्चा करावी लागणार आहे.