शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (15:33 IST)

छत्रपती शिवाजी महाराजयांच्या राजमुद्रेचा अर्थ नेमका काय? जाणून घ्या सविस्तर

मनसेने आपला जुना झेंडा बदलला असून त्याच्या जागी भगव्या रंगातील झेंडा आणला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या राजमुद्रेचा नेमका काय अर्थ आहे हे आपण बघणार आहोत.
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली. शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे.
 
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
 
अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
 
खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे.
 
मुंबईतील नगरसेविकेच्या मुलास फसवणूकप्रकरणी अटक
 
दागिने, महागडय़ा वस्तू किंवा उपकरणे विकत घेऊन त्याचे पैसे ऑनलाईन चुकते केल्याचे भासवून दुकानदरांची फसवणूक करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली. निखिल सुमन असे या तरुणाचे असून, त्याची आई वसई-विरार महापालिकेतील नगरसेविका आहे. या कारवाईनंतर मुंबई, ठाण्यातील आणखी १५ व्यावसायीक फसवणुकीची तक्रार घेऊन पुढे आले आहेत.
 
मानखुर्द येथील सराफा व्यावसायीकाकडून निखिल याने काही दिवसांपूर्वी साडेपाच लाख रुपये किंमतीचे दागिने विकत घेतले. ही रक्कम ऑनलाईन प्रक्रियेने खात्यावर जमा करतो, असे त्याने दुकानदाराला सांगितले. काही मिनिटांनी त्याने रक्कम जमा केल्याचा लघुसंदेशही दुकानमालकाला दाखवला. तो पाहून दुकानदाराला खात्री पटली आणि निखिल तेथून निसटला. दिवस संपला तरी पैसे खात्यावर न आल्याने दुकानदार चिंतेत पडला. दोन दिवस वाट पाहूनही पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीचा समांतर तपास मालमत्ता कक्षाचे लक्ष्मीकांत साळुंखे यांनी सुरू केला. साळुंखे आणि पथकाने तांत्रिक तपास, खबऱ्यांच्या माध्यमातून निखिलला अटक केली. चौकशीत त्याने अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील अनेक दुकानदारांना फसवल्याची कबुली दिली. आरोपीची आई नगरसेविका आहे. निखिल वाईट मार्गाला लागल्याने त्याच्याशी संबंध तोडल्याचे सुमन कुटुंबीयांनी स्पष्ट केले.