शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (18:28 IST)

3 मे पर्यंत दारुची दुकानं बंदच

मुंबईत ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. जिल्हाधाकिरी राजीव निवतकर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. अर्थात लॉकडाउन संपेपर्यंत दुकानं बंदच राहणार आहे, त्यात कुठलीही सूट देण्यात आलेली नाही.
 
याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. मात्र जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत लागू असणार असल्याचं सांगितलं आहे.