Last Modified: पुणे , मंगळवार, 30 मार्च 2010 (17:24 IST)
अमर यांनी केला अमिताभचा बचाव!
गुजरात दंगली संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ असताना त्याबाबत अमिताभचे मत जाणून घेणे म्हणजे मुर्खपणा असून ते यावर भाष्य कसे करू शकतील, अशी भूमिका समाजवादी पक्ष सोडून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेल्या अमर सिंह यांनी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह पुण्यातील सिंबॉयसिस संस्थेच्या एका कार्यक्रमास उपस्थित असताना त्यांनी हे मत मांडले.
गेल्या काही दिवसांपासून अमर सिंह व बच्चन कुटुंबीयांमध्ये दुरावा वाढत चालल्याचा दावा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी केला असून त्या पार्श्वभूमीवर आज दोघे या कार्यक्रमात येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष होते.
तर महाराष्ट्रात सी-लिंकच्या उदघाटनास अमिताभ यांना आमंत्रित केल्यानंतर कॉंग्रेसकडून सुरू असलेल्या वादामुळेही वातावरण तापले आहे. अमिताभ यांनी गुजरातचा ब्रँड अम्बेसेडर बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर टीका केली असून दंगलीत संदर्भात मोदींवर असलेल्या आरोपांबद्दल अमिताभ यांची भूमिका काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यास अमर सिंह यांनी उत्तर दिले आहे.