1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीर भारतापासून कोणीच तोडू शकत नाही: राजनाथ सिंह

नवी दिल्ली- जगातील कोणतीही ताकद जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर राज्यसभेत उत्तर दिले. काश्मीरबाबत चर्चा झाल्यास ती फक्त पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात होईल, असे राजनाथ सिंह यांनी पाकला ठणकावून सांगितले आहे. 
 
100 अ‍ॅम्बुलन्सचे नुकसान होऊन देखील सरकारने या ठिकाणी 400 अ‍ॅम्बुलन्स तैनात केल्याचे यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. तसेच हिंसाचारामध्ये ४५०० सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहितीही त्यांनी राज्यसभेत दिली. 
 
काश्मीरमधील घटनेत पाकिस्तानचा हात असल्याचे सांगत, त्यांनी काश्मीरमध्ये पाकच्या समर्थनार्थ होणारी घोषणाबाजी सहन करणार नाही, असंही म्हटलं आहे. काश्मीर मुद्द्यावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वपक्षीय बैठक होणार असल्याचीही माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी दिली आहे.