सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (14:25 IST)

पाकिस्थानी फवाद भारतातून पळाला

भारतात जम्मू काश्मिर येथील उरी लष्करी बेस वर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला होता. भारताने कितीही प्रयत्न केले तरीही पाकिस्थान नीट वागत नाही. तर दुसरीकडे अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका पाकिस्थान विरोधात मांडली. तर   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याची धमकी दिली होती. त्याचा परिणाम म्हणून कि काय  पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने भारत सोडल्याचं वृत्त आहे. 
 
एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचुपरित्या भारतातून पळून गेला आहे. दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण'चं पाचवं सत्र लवकरच सुरू होणार आहे. 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या शोमध्ये  फवाद खान गेस्ट म्हणून येणार होता. मात्र,आता मनसेच्या धमकीनंतर फवादच्या जागी शाहरूख खान आणि आलिया भट्ट येणार आहेत. करण जोहरचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटातही फवाद खान खास भूमिकेत आहे. सोशल मिडीयावर अजूनही पाकिस्थान विरोधात मत प्रदर्शित होत आहेत.