1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (09:07 IST)

पीओके पाकचा, काश्मीर भारताचा

पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा, तर जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग राहील असे वक्तव्य जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केले. भारत आणि पाकिस्तानला काश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर तो चर्चेनेच सोडवावा लागेल असेही ते म्हणाले.
 
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानात आहे आणि पाकिस्तानातच राहील, तर जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतातच राहील, हे आपल्याला समजण्चाची गरज आहे असेही ते एएनआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
 
युद्ध हा समस्या सोडवण्याचा उपाय नव्हे, त्यात आपण केवळ आपले जीवच गमावू. ही समस्या सोडवण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग असल्याचे ते पुढे म्हणाले.