1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Updated :गुडगाव , बुधवार, 23 जुलै 2014 (11:47 IST)

हायप्रोफाइल विदेशी तरुणींच्या सेक्सरॅकेटचा पर्दाफाश

दिल्ली-एनसीआरमध्ये विदेशी तरुणींच्या सेक्स रॅकेटचा मंगळवारी पर्दाफाश झाला. गुडगाव येथील 'ओमॅक्स मॉल'मध्ये पोलिसांनी चार विदेशी  तरूणींसह पाच तरूणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेल्या तरूणींमध्ये एका विदेशी तरूणीचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये सेक्सरॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस या टोळीच्या मागावर होती. तरुणींकडून  दिल्लीतील व्हीव्हीआयपी ग्राहकांची यादी जप्त करण्‍यात आली आहे.

पोलिस उपायुक्त विवेक शर्मा म्हणाले, गुन्हे शाखेला सेक्स रॅकेटबाबत गुप्त माहिती मिळाली होती. आरोपी तुषार उर्फ सैयद दिल्लीतून दोन गाड्यांमधून चार तरूणींसोबत पाच तरूणांना घेऊन येणार आहे. तर सोहना रोडजवळ असलेल्या ओमॅक्स मॉलजवळ ग्राहकांना बोलावण्यात आले आहे. येथे ग्राहकांकडून पैसे घेऊन तरूणींना त्यांच्या हवाली करण्यात येणार होते. पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक बनवून एका गटाला टोळीकडे पाठवले. शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना रंगेहाथ अटक केले.