मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 21 मे 2016 (13:32 IST)

‘नीट’परीक्षा होणारच:जे पी नड्डा

केंद्र सरकार अध्यादेशाद्वारे ‘नीट’ परीक्षा रद्द करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण ते तथ्यहीन आणि चुकीचं आहे. मी यापूर्वीही सांगितलं होतं, ‘नीट’ परीक्षा होणारच. परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला आहे, आता दुसरा टप्पा 24 जुलैला होणारच, असं स्पष्ट शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. 
 
या सर्व मुद्द्याबाबत अजून सल्लामसलत सुरुच आहे. पण मी सांगू इच्छितो की ‘नीट’ परीक्षा होणारच, त्यामधून सूट देण्यात आलेली नाहीच. परीक्षेचा दुसरा टप्पा 24 जुलैला होणारच. सध्या हिंदी आणि इंग्रजीत ही परीक्षा होणारच आहे. त्यामुळे कोणीही ‘नीट’ परीक्षेवरुन संभ्रम निर्माण करु नये, असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं आहे.