गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (12:47 IST)

विषारी दारू पिल्याने 7 जणांचा मृत्यू

drink
बिहारमधील सिवानमध्ये विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर 10 पेक्षा अधिक लोक रुग्णालयात दाखल आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील सिवानमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर अली आहे. तर अधिक लोकांची प्रकृती खालावली आहे. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पण, विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूला प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
 
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर मद्य प्राशन केलेल्या दोन जणांची दृष्टी गेल्यामुळे तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

Edited By- Dhanashri Naik