बिहारनंतर आता हिमाचल प्रदेशात विषारी दारूने 7 जणांचा बळी घेतला
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये बनावट दारू प्यायल्याने आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 12 जण रुग्णालयात दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रतिभा सिंह यांनी मेडिकल कॉलेज नेरचोक गाठून आजारी व्यक्तीची विचारपूस केली. अवैध दारूच्या रॅकेटबाबत अनेकवेळा प्रशासनाला माहिती देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथील सालापड भागात बनावट दारू प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 12 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेबाबत तपास सुरू आहे. दुसरीकडे, खासदार प्रतिभा सिंह यांनी मंडीतील नेरचोक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या 12 जणांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार प्रतिभा सिंह म्हणाल्या की, ही घटना दुःखद आहे. बनावट दारू प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू झाला असून 12 जणांवर उपचार सुरू आहेत.